कळवा हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा आजारी! Kalwa Hospital Problem

कळवा हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा आजारी!

कळवा हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा आजारी!
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज कळवा हॉस्पिटलची आरोग्य यंत्रणा आजारी पडली आहे... विशेष म्हणजे ४ दिवसांपूर्वी उदघाटन होऊनही या हॉस्पिटलमधली आयसीयू आणि अत्याधुनिक सेवा ठप्प पडली.

४ दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अत्याधुनिक यंत्रणेचे आणि आयुसीचं उदघाटन केलं होतं. ही अत्याधुनिक यंत्रणा चालवण्यासाठी आवश्यक असणा-या स्टाफची मात्र नेमणूक करण्यात आलेली नाही. या बंद आरोग्य यंत्रणेमुळं रुग्णांचे हाल होत आहेत. ४ दिवसांतच आरोग्य यंत्रणा ठप्प झाल्यानं उदघाटनाचा घाट का घालण्यात आला असा सवाल सामान्यांकडून उपस्थित करण्यात येतोय.

उदघाटनाचा हा घाट फक्त उद्धवजींना पुण्य मिळावे, श्रेय मिळावे यासाठी होता का अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटत आहे. आता ही आरोग्य यंत्रणा सुरु करुन रुग्णांना न्याय मिळणार का याकडं सा-याचं लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, May 19, 2013, 21:08


comments powered by Disqus