Last Updated: Sunday, September 22, 2013, 15:31
www.24taas.com, झी मीडिया, कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी झालेल्या हाणामारी प्रकरणाची शिवसेनेनं दखल घेतलीय. याप्रकरणी ३२ शिवसेना नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आलेत. जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी हे राजीनामे घेतलेत.
शुक्रवारी पालिकेच्या महासभेला कुस्तीच्या आखाड्याचं स्वरूप आलं होतं. शिवसेनेचे माजी स्थायी सामिती सभापती मल्लेश शेट्टी आणि शिवसेनेचेच सभागृह नेते रविंद्र पाटील यांच्यात चक्क हाणामारी झाली.
कल्याण पूर्वेच्या पाणी प्रश्नाबाबत सभागृह नेते गंभीर नसल्याचा आरोप करत शेट्टी यांनी पाटील यांना मारहाण केली. त्यांला पाटील यांनी प्रतिकार केला. अखेर अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर शेट्टी आणि पाटील यांच्यातली ही हाणामारी थांबली.
महापौरांच्या समोरच हा प्रकार घडला. मात्र महापौर आणि हाणामारी करणारे दोन्ही नेते शिवसेनेचेच असल्यामुळं कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप होतोय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, September 22, 2013, 15:30