कल्याण महापौर निवडणूक आज; `मनसे किंगमेकर`, Kalyan Mayor election today MNS kingmaker

कल्याण महापौर निवडणूक आज; `मनसे किंगमेकर`

कल्याण महापौर निवडणूक आज; `मनसे किंगमेकर`
www.24taas.com, झी मी़डिया, कल्याण

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी शिवसेनेनं कल्याणी पाटील तर काँग्रेस आघाडीनं वंदना गीध यांना रिंगणात उतरवलंय. तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राहुल दामले आणि राष्ट्रवादीचे विकास म्हात्रे यांच्यात लढत आहे.

कल्याण डोंबिवलीत सेना-भाजपा युतीला निर्णायक बहुमत नाही. त्यामुळे मनसेची भूमिका निर्णायक राहणार आहे. परिवहन आणि बालकल्याण समितीचे सभापतीपद यापूर्वीच मनसेला देण्यात आलंय. त्यामुळे या निवडणुकीत मनसे सेना-भाजपा युतीला मदत करणार का याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

कल्याण डोंबिवलीती महापालिकेत एकूण १०७ जागा आहेत. यामध्ये शिवसेनेला ३१, भाजपाला ९, काँग्रेसला १५, तर राष्ट्रवादी कडं १४ जागा आहेत. बहुमतासाठी ५४ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे मनसेच्या २७ आणि ११ अपक्ष उमेदवारांना मोठे महत्व आलं आहे. ११ अपक्षांपैकी ७ जणांचा सेनेला, तिघा जणांचा राष्ट्रवादीला तर १ नगरसेवकाचा मनसेला पाठिंबा आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 11, 2013, 12:24


comments powered by Disqus