कल्याण-वाशी रेल्वे मार्गाने जोडणार, मार्गाला मंजुरी, Kalyan- vashi Railway Route

कल्याण-वाशी रेल्वे मार्गाने जोडणार, मार्गाला मंजुरी

कल्याण-वाशी रेल्वे मार्गाने जोडणार, मार्गाला मंजुरी
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

कल्याण आणि नवी मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कल्याण-वाशी नव्या रेल्वे मार्गाने जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वेच्या पुरवणी अर्थसंकल्पात कल्याण-वाशी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती खासदार आनंद परांजपे यांनी दिलेय.

कल्याण- वाशी मार्गाला मंजुरी मिळाल्याने हा प्रकल्प २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या नव्या मार्गासाठी ४०५ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. कल्याण तसेच वाशीतील प्रवाशांना ठाणे येथे जावे लागत होते. मात्र त्यांचा हा आता त्रास वाचणार आहे.

रेल्वेमंत्री मल्लीकार्जुन खरगे यांनी सादर केलेल्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये या मार्गाला मंजुरी दिली. हा मार्ग मुंबई रेल्वे विकास परिषद आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. या मार्गाचे काम २०१५ मध्ये हाती घेण्यात येणार आहे.

कळवा येथे एलिव्हेटेड स्थानक तयार करण्यात येणार आहे. कळवा स्थानकाच्या डाव्या बाजूने ऐरोलीकडे जाणारा मार्ग टाकला जाणार आहे. या मार्गासाठी खास १२ डब्यांच्या दोन लोकल विकत घेण्यात येणार आहेत. त्यांच्या ३२ फेऱ्यांना मान्यता दिली आहे. या गाड्यांमुळे ठाणे-वाशी मार्गावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 15, 2014, 08:25


comments powered by Disqus