नारायण राणे यांचा तोल सुटला, तर कोकणात नक्षलवाद , kasturirangan Committee on Narayan Rane

नारायण राणे यांचा तोल सुटला, तर कोकणात नक्षलवाद

नारायण राणे यांचा तोल सुटला, तर कोकणात नक्षलवाद
www.24taas.com, झी मीडीया, रत्नागिरी

कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींना विरोध करताना उद्योगमंत्री नारायण राणे यांचा तोल सुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोकणातली गावं इकोफ्रेंडली घोषित झाली, तर इथं नक्षलवाद पसरेल असं म्हटलंय.

एखाद्या गोष्टीला विरोध दर्शवताना आपण काय बोलतो आणि त्याचा परिणाम काय होतो, याचं भान राज्याच्या मंत्र्यांना नको का ? यदाकदाचित कस्तुरीरंगन यांच्या शिफारशी मान्य झाल्याच, तर कोकणातल्या तरुणांनी बंदुका हाती घ्याव्यात, असं त्यांना सुचवायचं आहे का? राज्य मंत्रिमंडाळाच्या कालच्या बैठकीनंतर वेगवेगळे खुलासे समोर येतायत. नारायण राणेंशी आपला कोणताही वाद नाही, असा खुलासा पतंगराव कदम यांनी केलाय.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावर काहीही बोलायला तयार नाहीत. तर रत्नागिरीतल्या सभेत मंत्रिमंडळ बैठकीतल्या गोष्टी बाहेर सांगत नाही, असं राणेंनी सांगतिलं. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाले नाहीत हा पंतगरावांचा दावा कितपत बरोबर आहे, असा प्रश्न उपस्थित आलाय.

पश्चिम घाटातील जैव विविधता आणि निसर्गसंपदा जपण्यासाठी प्रा. माधव गाडगीळ समितीच्या बहुतेक शिफारशी डॉ. कस्तुरीरंगन समितीनेही कायम ठेवून खाण लॉबी व राजकारण्यांना मोठा धक्का दिलाय. त्यामुळे राणे संतप्त झाले आहेत.

या समितीमुळे कोकणचा विकास ठप्प होईल. त्यामुळे आपण कोकणच्या विकास आड येणाऱ्यांना खपवून घेणार नाही. वेळप्रसंगी मी राजीनामा देऊन आंदोलन करेन, अशी धमकी राणे यांनी दिली होती. त्यानंतर मंडणगडमधील सभेत राणे यांनी कोकणातील तरूण हातात बंदुका घेतील, असे धक्कादायक विधान केलेय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, December 5, 2013, 19:00


comments powered by Disqus