राज ठाकरेंच्या उपस्थितीत फोडला टोलनाका, kharegaon toll naka todfod

राज ठाकरेंच्या उपस्थितीत फोडला टोलनाका

राज ठाकरेंच्या उपस्थितीत फोडला टोलनाका
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

गुरुवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्याजवळचा खारेगाव टोलनाक्याची तोडफोड केलीय. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही तोडफोड झालीय.

खारेगाव टोलनाक्यावर एका महिलेशी टोल कर्मचाऱ्यानं टोलवरून हुज्जत घातल्यामुळं मनसे कार्यकर्त्यांनी हा हंगामा केल्याचं सांगितलं जातंय. या मार्गावरून जाणाऱ्या एका महिलेनं टोल भरण्यास नकार दिला. त्यामुळं टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यानं या महिलेशी हुज्जत घालत `मनसे`लाही अपशब्द वापरले.

ही बाब स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी थेट टोलनाक्यावर जाऊन गोंधळ घातला आणि टोलनाक्याची तोडफोडही केली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014, 17:02


comments powered by Disqus