Last Updated: Thursday, January 31, 2013, 12:44
www.24taas.com, ठाणेठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यात खरीवली इथं एका चौदा वर्षीय आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. वीटभट्टीवर कामावर असलेल्या या मुलीचे रविवारी रात्री चार तरुणांनी घरातून अपहरण केले होते. सोमवारी तिला दुपारी बेशुध्द अवस्थेत तिच्या घरासमोर आणून सोडण्यात आले.
ती शुध्दीवर आल्यावर तिनं तिच्यावर बलात्कार झाल्याचं घरच्यांना सांगितलं. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणं गाठलं, मात्र पोलिसांनी बलात्कार झाल्याचा गुन्हा न दाखल करता साधी एनसी दाखल करुन मुलीला रुग्णालयात पाठवलं.
सामाजिक संघटना आणि `झी २४ तास`च्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी रविंद्र मुकणे आणि तीन अज्ञात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलींवर ठाण्याच्या सिवील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असून आरोपी मात्र अजुनही फरार आहेत.
First Published: Thursday, January 31, 2013, 12:36