कोकण रेल्वे हाऊसफुल्ल; चाकरमानी वेटींगवर, kokan railway houseful on the occasion of ganeshotsav

कोकण रेल्वे हाऊसफुल्ल; चाकरमानी वेटींगवर

कोकण रेल्वे हाऊसफुल्ल; चाकरमानी वेटींगवर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा रेल्वेने जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

कोकणांत जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं आरक्षण दिवस सुरु होताच काही मिनिटांतच फुल्ल झाली आहेत. वेटिंग लिस्टने तर एक हजारपर्यंत मजल मारली आहे. ६ सप्टेंबरच्या शुक्रवारच्या सर्व गाड्यांची वेटिंग लिस्ट चाकरमान्यांचे डोळे पांढरे करणारी ठरली आहे. कोकणात सर्वात जलद जाणाऱ्या जनशताब्दीची वेटिंग लिस्ट १००० पर्यंत पोहचली आहे. मांडवी एक्सप्रेसच्या वेटिंग लिस्टचा आकडा आहे ८०५ तर मंगलोर एक्सप्रेस २००, कोकण कन्या ८८८ आणि राज्यराणीचे वेटिंग लिस्ट १००० पर्यंत पोहचले आहे. एव्हढंच नाही तर ५ सप्टेंबर म्हणजे गुरुवारीसुद्धा कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या फुल्ल आहेत. जनशतबादीची वेटिंग लिस्ट ५३१, मांडवी २७१, मंगलोर २००, कोकणकन्या ६४१ आणि राज्यराणीच्या वेटिंग लिस्टचा आकडा ५५५ पर्यंत पोहचला आहे.

तेव्हा मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाने चाकरमान्यांचा त्रास दूर करण्यासाठी जादा गाड्या सोडणे गरजेचं आहे. नाहीतर खाजगी गणशोत्सव काळातील चाकरमान्यांचा प्रवास दरवर्षीप्रमाणे जीवघणा ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013, 08:09


comments powered by Disqus