खराब रस्त्यांमुळे कोकणातला पर्यटनव्यवसाय धोक्यात,Kokan Tourism Adversally affected due to Bad Road

खराब रस्त्यांमुळे कोकणातला पर्यटनव्यवसाय धोक्यात

खराब रस्त्यांमुळे कोकणातला पर्यटनव्यवसाय धोक्यात

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

चांगले रस्ते हे विकसित देशाची निशाणी मानली जाते. पर्यटनस्थळासाठीही हेच तत्व लागू आहे. पर्यटनस्थळी पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी रस्ते चांगले असणं ही मुलभूत गरज आहे. मात्र कोकणात नेमकं याच्या उलट घडतंय.

खराब रस्त्यांमुळे कोकणातला पर्यटनव्यवसाय धोक्यात आलाय. जागतिक पर्यटन दिनानिमित्त झी मीडियाचा हा विशेष रिपोर्ट...

गुहागर तालुक्यातलं बामणघळं हे पर्यटनस्थळ दुर्लक्षित राहिलंय ते केवळ रस्त्यांमुळे. समुद्राच्या लाटांचे उंच उडणारे कारंजे मनमोहक दिसतात.

हा नयनरम्य समुद्र किनारा लाभलेलं हे पर्यटन स्थळ राज्याच्या पर्यटन यादीत अग्रस्थानी आहे. मात्र गेल्या दहा वर्षात या ठिकाणी पोहचणारा मार्ग काढण्यात सरकारला यश आलेलं नाही.

मुरुड कार्ले परिसरातही हीच परिस्थिती आहे. या ठिकणी डॉल्फिन पाहण्यास हजारो पर्यटक येतात. मात्र या किना-यावर अस्वच्छता वाढत असून या गावातले रस्तेही खराब असल्यानं पर्यटकांची संख्या वाढण्यास मर्यादा येतात.

पर्यटनाने सरकारला कोट्यावधींचा महसूल मिळतो. मात्र अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आजही पर्यटन मित्र राज्य बनलेलं नाही.

महाराष्ट्राला पर्यटनात अग्रेसर करण्याचा मार्ग हा कोकणतल्या चांगल्या रस्त्यामधून जातो हे सरकारला आज तरी उमजावं एवढीच अपेक्षा!



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, September 27, 2013, 19:03


comments powered by Disqus