Last Updated: Saturday, September 21, 2013, 14:55
ww.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईकोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दीपासून सुटका होण्यासाठी सुरू करण्यात आलेली स्पेशल गाडी दि. २२ सप्टेंबर पर्यंत चालवण्यात येत आहे. रत्नागिरी ते रोहा दरम्यान ही गाडी धावणार आहे. गर्दीमुळे ही गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
गणपती उत्सवाची गर्दी लक्षात घेता रत्नागिरी-रोहा दरम्यान ही स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आली आहे. अनंतचतुर्थीनंतर कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे रत्नागिरी स्थानकातून ही गाडी सकाळी सोडण्यात येणार आहे. अप आणि डाऊन मार्गावर ०५००९ आणि ०५०१० गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी रत्नागिरीतून सकाळी १०.२५ सुटेल ती रोह्याला दुपारी ३.३० वाजता पोहोचेल.
तर डाऊन मार्गावर ०५००९ ही गाडी रोहातून सायंकाळी ४.०५ वाजता सुटेल ती रत्नागिरी रात्री ९ वाजता पोहोचेल. ही विशेष गाडी १२ डब्यांची असेल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, September 21, 2013, 14:55