Last Updated: Saturday, February 8, 2014, 23:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकोकणातल्या चाकरमान्यांसाठी खुषखबर आहे. कोकणातल्या रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता लवकरच डबल डेकर रेल्वे सुरू केली जाणार आहे. लवकरच डबल-डेकर ट्रेन धावणार आहे. आगामी अर्थसंकल्पात या रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
डबल डेकर ट्रेन सुरू करण्यामागे मोठा अडथळा होता तो उंचीचा. विशेष करून पारसीक बोगद्यामधून डबल डेकर ट्रेनचे डबे जातील का, याबाबत अडचण होती. मात्र डबल डेकर ट्रेनचा डबा हा पारसिकच्या टनेलमधून जाऊ शकतो, असं नुकत्याच घेतलेल्या चाचणीवरून स्पष्ट झालंय. त्यामुळे येत्या रेल्वे बजेटमध्ये कोकणासाठी डबल डेकर ट्रेन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय.
कोकण रेल्वे मार्गावर मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. अनेक जादा गाड्या सुरू करूनही गर्दीवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. रत्नागिरी ते मुंबई आणि चिपळूण मुंबई अशा गाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सध्याच्या गाड्यांचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसा उपयोग होत नाही. अनेकवेळी कोकणातील प्रवाशांना वेटींगनेच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नव्याने रत्नागिरीसाठी दोन आणि सिंधुदुर्गसाठी आणखी एक गाडी सुरू कऱण्याची मागणी होत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, February 8, 2014, 20:53