वळविलेल्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार, Konkan Railway route, Position of Trains today

वळविलेल्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार

वळविलेल्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या आता कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार आहेत. पहाटे 4.20 वाजता नागोठणे येथील अपघातग्रस्त दिवा-सावंतवाडी गाडीचे डबे हटविण्यात यश आले. त्यानंतर कोकण रेल्वेची सेवा सुरु झाली आहे.

काल घोषणा केलेल्या गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. आता या गाड्या कोकण रेल्वे मार्गाने रवाना होती. 12133 सीएसटी टर्मिनस - मंगलोर एक्स्प्रेस, 12134 मंगलोर - सीएसटी एक्स्प्रेस या गाड्या अन्य मार्गांऐवजी कोकण रेल्वे मार्गाने धावत आहेत.

तर 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - त्रिवेंद्रम नेत्रावती एक्स्प्रेस आपल्या निर्धारीत 4.40 मिनिटांनी आज सुटेल. तर 12620 मंगलोर - लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधी एक्स्प्रेसही कोणक रेल्वे मार्गावरून धावेल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.

नागोठणे येथील अपघातानंतर मुंबईकडे जाण्यासाठी चिपळूण रेल्वे स्थानकावर दाखल झालेल्या बिकानेर-कोईमत्तूर आणि खेड येथे थांबलेल्या मंगला एक्प्रेसचा मार्ग बदलून पुन्हा मडगावमार्गे व्हाया पुणे अशी सोडण्यात आली. यामुळे तब्बल सात तासांचा वाढीव प्रवास करावा लागला. बिकानेर-कोईमत्तूर गाडी सोडल्यानंतर त्यापाठोपाठ मंगला एक्प्रेसही मडगावमार्गे सोडण्यात आली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014, 12:06


comments powered by Disqus