मालगाडीचे ४ डबे घसरल्यानं कोकण रेल्वे ठप्पKonkan Railway stopped due to slip of Freight coaches

मालगाडीचे ४ डबे घसरल्यानं कोकण रेल्वे ठप्प

मालगाडीचे ४ डबे घसरल्यानं कोकण रेल्वे ठप्प
www.24taas.com, झी मीडिया, उक्शी

कोकण रेल्वेवर मालगाडीचे चार डब्बे घसरल्यामुळे वाहतूक ठप्प झालीय. आज सकाळी उक्शी रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडलीय. दरम्यान, मालगाडीचे डबे रुळावरून हटवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या कामासाठी आठ ते दहा तास लागणार असल्याने अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मांडवी आणि जनशताब्दी या गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर मुंबईकडे येणारी मंगला एक्स्प्रेस रत्नागिरीला थांबवण्यात आली आहे. दादर सावंतवाडी उन्हाळी स्पेशल गाडी आडवली स्थानकावर थांबवली आहे. गोव्याकडे येणारी जनशताब्दी खेळला थांबवलीय. मुंबईकडे येणारी दुरान्तो मडगावला थांबवण्यात आली. तर गोव्याकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस कामवे रेल्वे स्टेशनवर खोळंबली आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाव घेतली आहे. मात्र रेल्वे रुळावरून मालगाडीचे डबे दुर हटवण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी १२ ते १४ तास लागतील अशी शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळं प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014, 11:37


comments powered by Disqus