कुणबी समाजाचं शक्तीप्रदर्शन Kunbi community rally

कुणबी समाजाचं शक्तीप्रदर्शन

कुणबी समाजाचं शक्तीप्रदर्शन
www.24taas.com, रत्नागिरी

बेदखल कुळांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे करूनही कुणबी समाजाला न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरीत कुणबी सेनेनं प्रचंड मोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शन केलं.

यापुढे कुठल्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण कोकणातल्या ग्रामीण भागात सुमारे 65 टक्के कुणबी समाजाची वस्ती आहे. मात्र निवडणूक वगळता या कुणबी समाजाला राजकीय पक्षांकडे स्थान नसल्यानं या समाजाचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. कुणबी समाजाच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.


कुणबी सेनेनं तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात जवळपास 20 हजार कुणबी लोकांचा सहभाग होता.

First Published: Monday, April 15, 2013, 21:28


comments powered by Disqus