दारुच्या नशेत महिला पोलीसाला मारहाण... , lady constable bitten by drunken sanjay

दारुच्या नशेत... महिला पोलीसालाच बदडलं!

दारुच्या नशेत... महिला पोलीसालाच बदडलं!
www.24taas.com, भाईंदर

भाईंदरमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला एका युवकाने दारुच्या नशेत मारहाण केल्याची घटना घडलीय. रविवारी रात्री ही घटना घडली. मारहाण झालेली महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक म्हणून भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

रविवारी शितल बामने या महिला पोलीस अधिकारी कामावरुन घराकडे दुचाकीवरुन निघाली होती. मिरा भाईंदर ओव्हर ब्रिजवर महिलेच्या दुचाकीला संजय जोशी यानं धडक दिली. याचा जाब विचारल्यानंतर संजय जोशी या तरुणानं दारुच्या नशेत पोलीस उपनिरीक्षक महिलेला मारहाण केली.

या प्रकरणी नवघर पोलिसांनी आरोपी संजय जोशी य़ाला अटक केली. महिला पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलल्यामुळे संजयवर ३३२, ३५३,१८६,२७१ या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल केला गेलाय, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू माने यांनी दिलीय.

First Published: Monday, January 14, 2013, 15:47


comments powered by Disqus