Last Updated: Monday, May 20, 2013, 09:28
www.24taas.com,झी मीडिया, ठाणे ठाण्यातील व्यापारी आजपासून संप मागे घेणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि व्यापारी यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आलाय.
ठाणे आणि पुण्याच्या पाठोपाठ नाशिककर नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एलबीटीविरोधात नाशिकमधील व्यापा-यांनी पुकारलेला संप मागं घेण्याची शक्यता आहे. संप मागं घेतल्यास नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
२४मे रोजी शरद पवार याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान व्यापा-यांनी पुकारलेल्या बंदमुळे ठाणेकरांचे खुप हाल झाले होते त्याबद्दल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश सावला यांनी झी मीडियाच्या मार्फत सर्व ठाणेकरांची जाहीर माफी मागितलीये..
तर दुसरीकडे LBT च्या विरोधात असलेल्या पुण्याच्या व्यापा-यांमध्ये मोठी फूट पडलीय. पूना मर्चंट चेंबर या बंद मधून बाहेर पडलीय. पूना मर्चंट चेंबर ही घाऊक व्यापा-यांची पुण्यातील संघटना आहे.
LBT विरूद्ध बंद पुकारणा-या पुणे व्यापारी महासंघातील पूना मर्चंटस चेंबर ही सर्वात मोठी व्याप-यांची संघटना होती. पूना मर्चंटस चेंबर बंद मधून बाहेर पडल्याने बंद पुकारणा-या व्यापा-यांना मोठा धक्का बसलाय. होलसेल व्यापा-यांची दुकानं सुरू होणार असल्याने छोटे व्यापारी देखील बंद मधून बाहेर पाडण्याची शक्यता आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, May 20, 2013, 09:28