ठाण्यात अज्ञातांनी बाईक्स जाळल्या, राजकारणही तापलं! lit the Bikes in Thane Wagle Estate Area, will Political angle?

ठाण्यात अज्ञातांनी बाईक्स जाळल्या, राजकारणही तापलं!

ठाण्यात अज्ञातांनी बाईक्स जाळल्या, राजकारणही तापलं!
www.24taas.com , झी मीडिया, ठाणे

ठाण्यात वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रघुनाथनगर परिसरात सहा बाईक्स जाळल्याची घटना घडलीय. अज्ञात इसमांनी या बाईक्स पेटवून दिल्या. तसंच परिसरातील ‘आनंदस्मृती’ व्यायामशाळाही पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

या घटनेनंतर नागरीक प्रचंड संतापले असून कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मध्यरात्रीनंतर रहिवासी गाढ झोपेत असतानाच समाजकंटकांनी डाव साधला.

पहाटे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप एकही आरोपी हाती लागलेला नाही. हा प्रकार नेमका कोणत्या उद्देशानं करण्यात आला, जाळपोळ करणारे कोण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, ठाण्यातल्या रघुनाथनगर परिसरातल्या बाईक जाळपोळीप्रकरणी राजकारण तापलंय. केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांच्याच बाईक जाळल्या असल्याचा आरोप काँग्रेस नेते रवी फाटक यांनी केलाय. आरोपींना अटक करा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा रवी फाटक यांनी दिलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, September 30, 2013, 12:00


comments powered by Disqus