Last Updated: Saturday, August 10, 2013, 18:32
www.24taas.com, झी मीडिया, अंबरनाथअंबरनाथमध्ये गेल्या चार महिन्यांपासून महिलांच्या डब्यात विष्ठा पसरून डबा घाण करणा-या विकृत इसमाला जेरबंद करण्यात अखेर रेल्वे पोलिसांना यश आलाय. या आरोपीचं नाव गोविंद भावसार असं आहे.
गोविंद भावसार प्रामुख्याने महिलांच्या प्रथमवर्गाच्या डब्यात शिरून मानवी विष्ठा डब्यातील बाकडे,हॅंडल, दरवाजे आणि खिडक्या या भागांना लाऊन डब्यातून पळ काढत असे. आरोपी रात्री उशिराच्या डब्यात हे कृत्य करत असे. त्यामुळे सकाळी धावपळीच्या वेळी कामावर जाणा-या महिलांना याचा त्रास होत असे. आरोपीच्या या कृत्या मुळे महिलावर्ग हैराण झाल्याने त्यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात आंदोलनही केले होते.
रेल्वे पोलिसांना समोर या आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर रेल्वे पोलिसानी आरोपी गोविंद भावसारला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 10, 2013, 18:11