राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर सर्वाधिक गुन्हेगार - माणिकराव, Manikrao thackeray on NCP

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर सर्वाधिक गुन्हेगार - माणिकराव

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर सर्वाधिक गुन्हेगार - माणिकराव
www.24taas.com, डहाणु

एखाद्या पक्षात सर्वात जास्त गुन्हेगार शोधायचे झाल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सापडतील, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

डहाणु नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या निवडणुकीत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार सामना रंगला आहे.

काही दिवसांपूर्वी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी काँग्रेसचे नेते स्वातंत्र्यकाळात देशासाठी तुरूंगात जायचे. आता भष्ट्राचार करुन जातात, अशी टीका केली होती. याला माणिकरावांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

First Published: Friday, November 2, 2012, 18:30


comments powered by Disqus