महापौराचं वराती मागून घोडं, करतायेत पिकनीक , mayor in picnic mood

महापौराचं वराती मागून घोडं, करतायेत पिकनीक

महापौराचं वराती मागून घोडं, करतायेत पिकनीक
www.24taas.com, कल्याण

`वराती मागून घोडं` असं KDMC च्या महापौर, नगरसेवकांच्या हाँगकाँग दौ-याचं वृत्त `झी 24 तास`नं नुकतंच दाखवलं होतं तरीही महापालिकेनं यातून काहीच धडा घेतलेला नाही. कारण हा दौरा संपतो न संपतो तोच महापौर आणि महिला नगरसेविका महिला बाल कल्याण समितीच्या कुल्लू मनाली दौ-यावर जात आहेत.

खरं तर याच समितीच्या मागच्या केरळ दौ-यातून कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना काय मिळालं असा सवाल झी २४ तासनं महिला बाल कल्याण समितीच्या सभापतींना विचारला असता.. मला माहित नाही, मुलांच्या परीक्षेमुळे मी दौरा अर्धवट सोडून परत आले` असं उत्तर त्यांनी दिलं.

तर सध्याच्या दौर्यातून काय साध्य होईल असं विचारलं तेंव्हा दौ-यावरून परतल्यावर सांगेन असं बेजबाबदार उत्तर त्यांनी दिलय. एकूणच हाही दौरा म्हणजे दिवाळी पिकनिक असल्याचा आरोप कल्याण-डोंबिवलीकर करतायेत..

First Published: Friday, November 2, 2012, 21:15


comments powered by Disqus