म्हाडा आता ठाण्यातही घरे बांधणार...., Mhada build new homes in thane

म्हाडा आता ठाण्यातही घरे बांधणार....

म्हाडा आता ठाण्यातही घरे बांधणार....
www.24taas.com, ठाणे

मुंबई आणि उपनगरात स्वतःच हक्काचं घर नसणाऱ्यांसाठी खूष खबर. म्हाडा आता गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी ठाणे आणि कळव्यात घरं बाधणार आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशा किंमतीत ही घरं म्हाडा बांधणार आहे.

य़ा धोरणानुसार गृहप्रकल्प म्हाडा आणि खाजगी विकासक या दोघांनी मिळून राबवायचा असून यामध्ये खाजगी विकासक आणि म्हाडा यांना समान एफएसाय मिळणार असून याच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. घरं बांधताना जमीन मालक किंवा अथवा खाजगी विकासक असेल त्याने आपली जमीन म्हाडाला भाडेतत्वावर द्यायची आहे.

त्यानंतर गृहप्रकल्प उभारताना ५० टक्के एफएसआय म्हाडाला आणि ५० टक्के एफएसआय खाजगी विकासकाला मिळणार आहे. याशिवाय बांधकामाची रक्कम शासनच देणार असल्याचे राज्य गृहनिर्माण मंत्री सचिन अहिर यांनी स्पष्ट केले. या माध्यमातून गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना जास्त घरे उपलब्ध करून देता येईल असे त्यांनी सांगितले.

First Published: Wednesday, February 6, 2013, 13:04


comments powered by Disqus