Last Updated: Thursday, January 9, 2014, 17:20
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यात एक धक्कादायक आणि चिड आणणारी घटना घडली. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या पिडीत मुलीला मित्राच्या घरी नेऊन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्यांनी वाईट कृत्य केलं.
पिडीत मुलीला तिच्या घरी सोडतो, असे सांगून एकाने तिला दुचाकीवरून मित्राच्या घरी नेले. तेथे तिला गुंगीचे औषध पाजून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ३० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हा घृणास्पद प्रकार जाकादेवी येथे घडला. या घटनेची तक्रार करण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बलात्कार प्रकरणी बुधवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसर्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. पीडीत मुलीस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संकेत तथा प्रथमेश मोहन शिवगण (२०), मयुरेश सुहास वरेकर (१९) या दोघांना अटक केली आहे.
३० डिसेंबरला नेहमीप्रमाणे पिडीत अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी निघाली होती. त्याचवेळी मयुरेश याने तिला जाकादेवी येथील घरी नेले. त्यानंतर तिला गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर तिघांनी बलात्कार केला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 9, 2014, 17:14