Last Updated: Wednesday, February 19, 2014, 16:10
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यात दापोलीत पैशाचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवून गरजू, निराधार महिलांना जाळ्यात ओढणा-या टोळीचा पर्दाफाश झालाय.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उजेडात आणलाय.
पोलिसांनी या प्रकरणी जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गात गुन्हा दाखल करावा लागलाय.
पैशांचा पाऊस पाडून दाखवतो, अशा भूलथापा देऊन दापोलीत काही महिला आणि तरूणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार सुरू होता.
या प्रकारात या महिलांचं आणि तरूणींचं लैंगिक शोषणही केलं जात होतं.
ही टोळी एका 21 वर्षांच्या तरूणीचं आयुष्य उध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होती. पण अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार हाणून पाडला.
विशेष म्हणजे दापोली पोलीस स्टेशनपासून अवघ्या 10 फुटांच्या अंतरावर महिलांचं असं शोषण सुरू होतं.
पोलिसांना याचा पत्ताच नव्हता. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अखेर पुढाकार घेतल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या टोळीमार्फत सेक्स रॅकेटही चालवलं जात असल्याची शक्यता आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.
या प्रकरणातल्या महिला आरोपीलाही तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 19, 2014, 15:57