आईनेच केला पोटच्या मुलीचा शरीरविक्रीसाठी सौदा, Mother sold her girls

आईनेच केला पोटच्या मुलीचा शरीरविक्रीसाठी सौदा

आईनेच केला पोटच्या मुलीचा शरीरविक्रीसाठी सौदा
www.24taas.com , झी मीडिया, ठाणे

पोटच्या मुलीचा शरीरविक्री करता सौदा करणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेला तिच्या साथीदारासह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. दरम्यान, या मुलीची सुटका करण्यात आली आहे. हा प्रकार मुंब्रा परिसरात घडला आहे.

मुंब्रा परिसरात एका १३ वर्षीय मुलीला शरीरविक्रीसाठी विकण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीशक सहजी जाधव यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या पथकाने फातिमा पलेस येथे छापा मारून या तेरा वर्षाच्या मुलीची सुटका केली मिळालेल्या माहितीनुसार या तेरा वर्षाच्या मुलीच्या आईनेच तिचा सोदा केला होता.

नथ उतरवण्याचे कारण देवून या महिले आपल्या मुलीचा एका इसमाशी १लाख रुपयाला सोदां ठरवला होता. त्याकरिता दहा हजार रुपये आगाऊ घेतले होते ठरलेल्या सौद्यानुसार ही महिला आणि तिचा एक साथीदार या तेरा वर्षांच्या मुलीलाचा फातिमा प्लेस या राहत्या घरीच व्यवहार करत होते. त्याचवेळी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या पथकाने एका सामाजिक संस्थेच्या मदतीने तिथे धाड टाकून या मुलीची सुटका केली.

मुलीची आई आणि तिचा साथीदार मेहबूब इस्माईल मुल्ला याला अटक केली आहे. सौद्यापोटी तिला १० हजार रूपये आगाऊ मिळाले होते. तर उर्वरित ९० हजार रूपये नंतर मिळणार होते, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 16:30


comments powered by Disqus