मुंबई-गोवा हायवे अपघातात ३ ठार, १५ जखमी, mumbai-goa highway accident, 3 dead

मुंबई-गोवा हायवे अपघातात ३ ठार, १५ जखमी

मुंबई-गोवा हायवे अपघातात ३ ठार, १५ जखमी
www.24taas.com,अलिबाग

मुंबई-गोवा महामार्गावर अपघांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी झालेल्या अपघातात ३ ठार तर १५ जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात मुंबई- गोवा हायवेवर जीप आणि व्हॅनमध्ये हा भीषण अपघात झालाय. अपघातात ३ ठार तर १५ जण जखमी झालेत. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. व्हॅनमधील तीन जण जागीच ठार झालेत. यामध्ये दोन मुंबईचे तर एक रत्नागिरी संगमेश्वरमधील आहे.

प्राथमिक उपचारानंतर जखमींना तातडीने मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आलयं. महामार्गावर होत असलेल्या अपघातामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याआधी रत्नागिरीतील खेड जगबुडी नदी पुलावर अपघात झाला होता. या अपघातात ३८ ठार तर १५ जण जखमी झाले होते. त्यामुळे या महामार्गाचे त्वरीत चौपदीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

व्हॅनमधील मृत्यूंची नावे

प्रभाकर जयराम पाटेकर (६८, कांजूर मार्ग), विनायक महादेव पावस्कर (३५ करजुवे, संगमेश्वर), रामदास नागेश गुरव (३५ बांद्रा, मुंबई)

First Published: Monday, March 25, 2013, 09:10


comments powered by Disqus