मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ४ ठार

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ४ ठार

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ४ ठार
www.24taas.com, झी मीडिया,अलिबाग

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. लक्झरी बस आणि ट्रकची समोरसमोर धडक होऊन ४ प्रवासी ठार तर १३ जण जखमी झालेत.

रायगड जिल्ह्यातील टोळ फाट्याजवळ रात्री हा अपघात झाला. जखमींना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मृतांमध्ये ट्रकचालक आणि बसमधील प्रवाशांचाही समावेश आहे. लक्झरी बस मुंबईहून कोकणाकडे निघाली होती.

मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. हा महामार्ग चौपदरी करण्याची गेल्या कित्येक दिवसांची मागणी आहे. पण, आणखी किती बळी जाण्याची सरकार वाट बघतंय, असा प्रश्न आता निर्माण झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 13, 2013, 10:20


comments powered by Disqus