Last Updated: Saturday, February 15, 2014, 11:59
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. या बिबट्याला गाडीने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राजापूरजवळ मुंबई गोवा महामार्गाच्या मध्यभागी हा बिबट्या पडल्याचे पाहून वाहनचालक आणि ग्रामस्थ घाबरले. महामार्ग ओलांडत असताना एखाद्या वाहनाच्या धक्याने या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
मृतावस्थेत आढळलेला हा बिबट्या मादी आहे. ती वर्षाची असल्याची असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 15, 2014, 09:36