Last Updated: Wednesday, October 9, 2013, 13:23
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेमुंब्र्यात इस्लामिक कल्चरल सेंटरसाठी २५ कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.
मुंब्रा कळवा या भागातल्या विकासाच्या मुद्द्यावर काल झालेल्या बैठकीत पवार यांनी ही घोषणा केलीय. यासंबंधीची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. कल्चरल सेंटर होणार अशी घोषणा वर्षभरापूर्वीच झाली होती.
सध्या भारतात इस्मामिक कल्चरल सेंटर फक्त नवी दिल्लीत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या सहकार्याने कळवा परिसरात कम्युनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयही सुरू करण्यात येणार आहे. अशा स्वरूपाचं हे पहिलंचं कॉलेज असणार आहे. याचा फायदा या भागातल्या तरूणांना अभियांत्रिकी शिक्षण प्राप्त करण्यासाठी होणार आहे.
तर दुसरीकडे यानिर्णयावर शिवसेनेने टीका केलीय. मुस्लिम मतांसाठीच काँग्रेस राष्ट्रवादीत स्पर्धा सुरू असून त्यातून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 9, 2013, 13:20