शंभर रुपयांवरून केली हत्या, Murder for only 100 rs.

शंभर रुपयांवरून केली हत्या

शंभर रुपयांवरून केली हत्या

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
केवळ १०० रुपयांसाठी कोणी कोणाचा खून करेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. पण नवी मुंबईतील सानपाडा येथे जुगार खेळताना १०० रुपये देण्यावरून झालेल्या मारहाणीचा राग मनात ठेवत एका तरुणाने एकाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली.

सानपाडा गावातील श्री नागेश्वतर शिव चॅरिटेबल ट्रस्टच्या शिवमंदिराजवळ बसविण्यात आलेल्या घरगुती गणपती मंडपात ही घटना आज सकाळी घडली.
या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे. अन्नू शेट्टी (वय २0, रा. उलवा) असे मृत तरुणाचे नाव आहे. सेक्टर ४ येथे एका ठिकाणी जुगार खेळत असताना महादेव जाधव (२२) या तरुणासोबत १०० रुपयांवरून त्याची झटापट झाली होती. या वेळी अन्नू त्याच्या बोटाला चावला होता. नंतर रात्री १० च्या सुमारास हे सर्वजण शिवमंदिराजवळील मंडपात एकत्र जमले. या वेळी त्यांचा वाद या गुन्हय़ात फिर्याद देणार्याा मंगेश ठाकूरने मिटवले होते.

अन्नू आणि महादेव त्यांच्या मित्रांसोबत मंडपात झोपले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास महादेव याने सोफ्यावर झोपलेल्या अन्नूचे डोके सोफ्याच्या लोखंडी भागावर जोरदार आपटले. यामध्ये डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम होऊन मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अन्नू याचा जागीच मृत्यू

First Published: Saturday, September 14, 2013, 20:00


comments powered by Disqus