फार्म हाऊसमध्ये एकाच वेळी चौघांचा खून, murder in panvel farm house

फार्म हाऊसमध्ये एकाच वेळी चौघांचा खून

फार्म हाऊसमध्ये एकाच वेळी चौघांचा खून
www.24taas.com, पनवेल

पनवेलजवळच्या शिरवली गावात 4 जणांची हत्या झाली आहे. शिरवलीजवळ असणा-या एका फार्म हाऊसवर हे मृतदेह सापडलेत. चौघंही मृत पनवेलचे रहिवासी आहेत. यातल्या तिघांची ओळख पटलीये. नितीन जोशी, बाळाराम चौपन्ने आणि रामदास पाटील अशी तिघांची नावं आहेत.

तर एकाची ओळख अद्यापही पटलेली नाही. घटनास्थळी एक पिस्तूलही सापडलय. तर रक्तात माखलेला एक दगडही सापडलाय. चौघांचीही हत्या डोक्यात दगड घालून केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

ज्या फार्म हाऊसमध्ये चौघांचे मृतदेह सापडले तो फार्म हाऊस पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्ता पाटील यांच्या मालकीचा असल्याचं सांगण्यात येतयं. मृत रामदास पाटील हे दत्ता पाटील यांचे चुलतभाऊ असल्याचं सांगण्यात येतयं.

First Published: Wednesday, November 14, 2012, 15:15


comments powered by Disqus