Last Updated: Wednesday, July 17, 2013, 07:28
www.24taas.com, झी मीडिया, कल्याणकल्याणमधल्या रेश्मा बिर्जे या तरुणीच्या हत्येचे गूढ उकललंय. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचं आता उघड झालंय. त्याला विरोध केल्यानं तिची हत्या झाल्याचं आता समोर आलंय.
6 मे रोजी कामावर गेलेली रेश्मा घरी परतलीच नव्हती. अखेरीस काही दिवसांपूर्वी ममता कॉलनी इथल्या सेफ्टी टँकच्या सफाईच्या वेळी रेश्माचा मृतदेह आढळला. त्यानंतर परिसरातल्या 100 हून अधिक जणांची पोलिसांनी चौकशी केली होती. मात्र पोलिसांना काहीच धागेदोरे हाती लागले नव्हते. अखेर याचा तपास कल्याण क्राईम ब्रांचकडे देण्यात आला. क्राईम ब्रांचच्या तपासात सिद्धेश हुल्ले या तरुणाचा नाव पुढे आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर रेश्माच्या हत्येची कबूली त्यानं दिली. दोघंही चांगले मित्र होते. सिद्धेशचे रेश्मावर एकतर्फी प्रेम होते.
6 मे रोजी त्याने रेश्माला घरी बोलावले आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र तिनं प्रतिकार केल्यानं रेश्माच्य़ा डोक्यावर कोयत्याने वार करुन हत्या केली... तब्बल 12 दिवस त्यानं रेश्माचा मृतदेह घराच्या किचनमध्ये ठेवला होता...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, July 16, 2013, 20:36