लोकसभा पराभवानंतर राणे सिंधुदुर्गात, Rane for the first time after the child`s loss in Sindhudurg

मुलाच्या पराभवानंतर राणे प्रथमच सिंधुदुर्गात

मुलाच्या पराभवानंतर राणे प्रथमच सिंधुदुर्गात
www.24taas.com, झी मीडिया, कणकवली

कोकणातील लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांच्या पराभवानतर काँग्रेसनेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे आज महिन्यानंतर आपल्या होम पीच वर म्हणजे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने राणे यांच्या या साम्राज्याला सुरुंग लावणारा निकाल दिला. राणे सध्या राजकीय भूकंप घडवण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र सध्या ते आपल्या पदाधिका-याची मते अजमावत आहेत असं सांगितलं जातंय. आज ते आपल्या होम पीच वर दखल झाले आहेत.

या दौऱ्यात ते आपण कुठच्या मतदार संघातून लढणार याची गणिते मांडतील अशी शक्यता आहे. सध्या ते कुडाळ मतदार संघाचे आमदार आहेत हाच मतदार संघ ते आपल्या साठी कायम ठेवणार का की कणकवली मतदार संघात लढणार याकडे लक्ष लागलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 11:56


comments powered by Disqus