Last Updated: Monday, January 27, 2014, 22:56
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरीधमक्या देऊन राज्यातील वसुली बंद होणार नाही, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरेंना ठणकावलं आहे. टोलमुळेच रस्त्यांमध्ये सुधारणा झाली आहे.
नारायण राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूखमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमात त्यांनी टोलप्रश्नी टोलेबाजी केली.
कोणी एकानं आंदोलन केलं, म्हणून टोल बंद केला जाणार नसल्याचंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. एकंदरीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टोलचा मुद्दा आणखी पेट घेणार आहे.
यात राज ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून टीका होत असल्याने, राज ठाकरे या टीकेला त्यांच्या शैलीत उत्तर द्यायला विसरणार नाहीत, हे निश्चित.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 27, 2014, 22:56