Last Updated: Friday, November 22, 2013, 17:44
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज रत्नागिरीत बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करू, असे जाहीर आव्हान राणे यांनी दिले.
शिवसेनेतर्फे विनायक राऊत यांना रत्नागिरीतून लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जर विनायक राऊत लोकसभा निवडणुकीत उतरलेत तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. ते आम्ही जप्त करू, अशा इशारा राणे यांनी दिला. शिवसेनेवर टीका करताना राणे यांनी राऊत यांना लक्ष्य केले.
राऊत यांना त्यांच्या गावात कोणी ओळखत नाही. त्यांचा मुंबईत पराभव झाल्यामुळे शेवटी धडपड म्हणून ते कोकणात नेतेगिरी करत फिरतात, अशी टीका राणे यांनी केली. विनायक राउत यांना या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत शिवसेनेकडून जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. राऊत यांना लोकसभेचे तिकिट मिळाले तर त्यांची लढत थेट विद्यमान खासदार निलेश राणेंशी होणार आहे. त्या अनुषंगाने नारायण राणेंनी राऊतांवर टीका केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 17:28