नवी मुंबईत बिल्डर बिजलानीवर गोळीबार, Lohariya murder prime accused Bijlani shot at

नवी मुंबईत बिल्डर बिजलानीवर गोळीबार

नवी मुंबईत बिल्डर बिजलानीवर गोळीबार
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईत

बिल्डर सुनीलकुमार लाहोरिया हत्या प्रकरणातील आरोपी बिल्डर सुरेश बिजलानी याची खारघरमध्ये कार अडवून मोटारसायकलवरून आलेल्या दोन मारेकर्यांचनी त्यांच्यावर गोळीबार केला. खारघर येथील सेंट्रल पार्कजवळील ग्रामविकास भवनसमोर शुक्रवारी भर दुपारी ही घटना घडली.

वाशी येथे एसके बिल्डरचे सुनीलकुमार लाहोरिया यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सिक्युरिटीचे कपडे घालून आलेल्या व्यंकटेश शेट्टीयार आणि वाजीद कुरेशी यांनी गोळीबार केला. तर एकाने डोक्यात नारळ हाणला, तर दुसर्या ने चॉपरने त्यांच्यावर वार केले. या वेळी व्यंकटेशला नागरिकांनी पकडून दिले होते.

या प्रकरणामध्ये बिल्डर बिजलानी, विजय गजरा, भूपेश गुप्ता, सुमित बच्चेवार आणि अनुराग गर्ग आदींचा समावेश असल्याची तक्रार लाहोरिया कुटुंबीयांनी केली होती. पुढे बिजलानीला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ६० दिवसांचा बेल दिला होता.

खारघरमध्ये राहत असलेले बिजलानी आसीफ करेल याच्यासह प्रोजेक्टची पाहाणी करण्यासाठी कारमधून जात असताना ग्रामविकास भवन चौकापासून काही अंतरावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन मारेकर्यांानी लोखंडी रॉडने ड्रायव्हरपुढील काच आणि मागील डावीकडील काच फोडली. शिवीगाळ करीत बिजलानीवर तीन राऊंड फायर करीत पळ काढला.

बिजलानी आणि आसीफ खाली वाकल्याने प्राण वाचले. त्यातील एक गोळी कारच्या सीटमध्ये रुतली. या वेळी आसीफने दोन राऊंड फायर केले. बिजलानीच्या तक्रारीवरून दोन अज्ञात मारेकरी, सनी लाहोरिया आणि विनोद चेंबूर ऊर्फ विनोद असरानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 25, 2013, 09:21


comments powered by Disqus