राष्ट्रवादीला नवी मुंबईत ‘दे धक्का’, Navi Mumbai corporation election

राष्ट्रवादीला नवी मुंबईत ‘दे धक्का’

राष्ट्रवादीला नवी मुंबईत ‘दे धक्का’
www.24taas.com, नवी मुंबई

राष्ट्रवादीला दणका देत शिवसेनेच्या नगरसवेकांने नवी मुंबई महापालिकेत प्रवेश केला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. ५४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार विठ्ठल मोरे यांनी विजय मिळवत पालकमंत्री गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक आणि महापौर सागर नाईक या राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘दे धक्का’ दिलाय.

शिवसेनेचे विठ्ठल मोरे यांनी राष्ट्रवादीच्या विजया ठाकूर यांना पराभवाची धूळ चारली. मोरे यांनी ३५८ मतांनी विजय संपादन केला. विठ्ठल मोरे यांनी पहिल्या फेरीत आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या विजया ठाकूर यांच्यावर १३६ मतांनी आघाडी घेतली. दुसर्या् फेरीत मोरे यांनी पुन्हा २२२ मतांची आघाडी घेतली.

मोरे यांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकार रेवती गायकर यांनी केल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या बाहेर जमलेल्या हजारो शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला.


काँग्रेसचे एकनाथ दुखंडे यांना १०९ मते मिळाले. विठ्ठल मोरे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेऊन त्यांची मिरवणूक काढली. यावेळी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हा विजय महायुतीचा आणि या प्रभागातील जनतेचा आहे. मतदारांनी माझ्यावर जो विश्वाहस टाकला त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. आजचा विजय म्हणजे नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या अधोगतीला झालेली सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर मोरे यांनी व्यक्त केली.

First Published: Tuesday, April 9, 2013, 12:13


comments powered by Disqus