नवी मुंबईत मेट्रोचा एक बळी, Navi Mumbai Metro`s first death

नवी मुंबईत मेट्रोचा एक बळी

नवी मुंबईत मेट्रोचा एक बळी
www.24taas.com,नवी मुंबई

नवी मुंबईत खारघर येथे मेट्रो रेल्वेसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. गोविंद चव्हाण अस मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

गोविंद सायंकाळी मेट्रोजवळून जात असताना त्याचा पाय घसरून तो खड्ड्यात पडला, हा खड्ड्या पाण्यानं भरलेल्या असल्यानं त्यात बुडुन दुर्देवानं गोविंदचा मृत्यू झालाय. मेट्रो प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांभोवती कोणतेही कुंपण करण्यात आलेलं नाही. शिवाय ज्या भागात मेट्रोची साईट आहे. त्या भागात कोणतीही सुरक्षाव्यवस्था नाही त्यामुळं मेट्रोसाठी खोदण्यात आलेले खड्डे मृत्यूचे सापळे बनलेत.

मेट्रो रेल्वे म्हणजे मृत्यूचे सापळे बनतायेत असंच चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच मेट्रो रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळून मुंबईत एका जणाचा मृत्यू झाला होता. तर आता नवी मुंबईत मेट्रोच्या पुलासाठी खोदलेल्या खड्डायत बुडून युवकाचा मृत्यू झालाय. कंत्राटदार आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करतायेत.

First Published: Monday, September 17, 2012, 14:57


comments powered by Disqus