तळोजात तुरूंगाधिका-यावर गोळीबार, Navi Mumbai police firing

तळोजात तुरूंगाधिका-यावर गोळीबार

तळोजात तुरूंगाधिका-यावर गोळीबार
www.24taas.comनवी दिल्ली

नवी मुंबईतल्या तळोजा इथं गोळीबार झाल्याची घटना घडलीय.तळोजा जेलच्या तुरूंगाधिका-यावर गोळीबार झालाय. भास्कर कचरे असं या अधिका-याचं नाव आहे.

संध्याकाळच्या सुमारास कचरे बाहेर फिरायला गेले असताना अज्ञात इसमांनी हा गोळीबार केलाय.. या गोळीबारात जेलर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झालेत.. तळोजाच्या पापर्डी पाडा इथं ही घटना घडलीय.. तळोजा जेलमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम आणि अरुण गवळी कैद आहेत.

तळोजा जेलमधील पोलीस सबइन्स्पेक्टर भास्कर कचरे यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप माने यांनी दिली.

आपल्या मित्रासोबत कारने जात असताना बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी कचरेंवर गोळीबार केला आणि ते फरार झाले. नवी मुंबईतील तळोजा कारागृह हे राज्यातील महत्वाचे कारागृह आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळी याला नुकतीच सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा तो या कारागृहात भोगत आहे. तसेच डॉन अबू सालेम यासारखे कैदीही आहेत.

या घटनेवेळी गाडीचा चालक आणि मालक अन्वर पटेल गाडी सोडून फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा हल्ला नियोजनबद्ध असून यामागे मोठा कट असण्याची शक्यतासुद्धा वर्तविण्यात येत आहे.

First Published: Monday, September 10, 2012, 12:26


comments powered by Disqus