Last Updated: Thursday, July 25, 2013, 23:31
www.24taas.com, झी मीडिया, पालघरपालघर तालुक्यात सध्या शिक्षण विभागाचा बोजवारा उडालाय. अनेक जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाहीत..तर जिथे शिक्षक रुजु केलेत ते शाळेवर जात नसल्यानं 25 हजार विद्यार्थ्याचं भवितव्य अंधारात सापडलय.
शाळा सुरु होऊन दिड महिना उलटलाय तरी पालघरमधील अनेक जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीयेत.अनेक शिक्षकांनी आपल्या आवडीच्या आणि जवळच्या शाळा मिळाव्या म्हणुन बदल्या करुन घेतल्या. मात्र या बदल्या करताना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कसलंही नियोजन न करता शिक्षकांच्या बदल्याचे आदेश दिले. त्यामुळं काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त शिक्षक तर काही ठिकाणी शिक्षकचं नाही असं चित्र निर्माण झालं .प्रसारमाध्यम आणि जागरुक पालकांनी ही बाब शिक्षण विभागाला लक्षात आणल्यानंतर शिक्षण विभागाचं बिंग फुटलं.त्यानंतर गटविकास अधिका-यांनी पटसंख्येनुसार शिक्षकांना रुजु होण्याचे आदेश दिले. मात्र शिक्षकांनी हे आदेश धाब्यावर बसवलेत.
शिक्षक बदल्यामध्ये मोठ्या आर्थिक व्यवहार झाल्यामुळं शिक्षकांना अधिका-यांचा धाक नसल्याचा आरोप करण्यात येतोय. मात्र या सर्व प्रकारात पालघरमधल्या 25 हजार विद्यार्थ्यांना कोणीही वाली नसल्याचं स्पष्ट होतोय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 25, 2013, 23:31