Last Updated: Saturday, November 17, 2012, 15:31
www.24taas.com, पनवेल पनवेल तालुक्यातील शिरवलीत झालेल्या चार जणांच्या हत्येच्या तपासाला वेग आलाय. घटनास्थळी पोलीसांना १३ सीमकार्ड आणि आठ मोबाईल सापडले असून याद्वारे महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी वक्त केलीय. मंगळवारी येथील दत्ता पाटील यांच्या फार्म हाउसवर रामदास पाटील, बलराम टोपले, नेतीन जोशी, आणि प्रीतम घरत यांची हत्या झाली होती.
हे चौघेही इस्टेट एजंट होते. पनवेल मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार होत आहेत. जमिनीला मिळणारे भाव आणि करोडोंची उलाढाल यामुळेहे हत्याकांड झाले असावं असा कयास बांधला जातोय. मात्र पोलिसांनी ही शक्यता फेटाळलीय.
तसेच या हत्याकांड मागे कोणताही राजकीय कारण नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. हत्याकांडातील आरोपींना लवकरच गजाआड करू असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केलाय.
First Published: Saturday, November 17, 2012, 15:13