अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली चिरडून पोलीसाचा मृत्यू Police dies by truck

अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली चिरडून पोलीसाचा मृत्यू

अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली चिरडून पोलीसाचा मृत्यू
www.24taas.com, डहाणू

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना डहाणुजवळ घडली आहे. सुभाष गायकवाड असं या अधिका-याचं नाव आहे.

बहा़ड चेकपोस्टवर ड्युटीला असताना ही घटना घडली. कोळश्याची अवैध वाहतूक करणारा हा ट्रक चेकपोस्ट चुकवून भरधाव वेगाने निघाला होता. या ट्रकला अडवण्याच्या प्रयत्नात गायकवाड असताना त्यांना जीव गमवावा लागला.

हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर गायकवाड यांना मृत घोषीत करण्यात आलं. ट्रकचा ड्रायव्हर गाडी सोडून फरार झालाय..पोलीस ड्रायव्हरचा कसून शोध घेत आहेत...

First Published: Friday, February 8, 2013, 20:42


comments powered by Disqus