Last Updated: Sunday, April 14, 2013, 09:18
www.24taas.com, नवी मुंबई कोकणातील ठाणे, नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील रिक्त झालेल्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे तरूणांना पोलीस दलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात १७६ जागांसाठी भरती होणार आहे. तर नवी मुंबईत २० जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांसाठी
www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०१३ या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ एप्रिलपासून सकाळी ९ ते ३० एप्रिल रोजी रात्री ११.४९ वाजेपर्यंत असणार आहे. परीक्षा शुल्क १२५ रूपये असणार आहे. परीक्षा शुल्क रक्कम भारतीय स्टेट बॅंकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे अथवा इंटरनेट बॅंकिग, क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे भरू शकता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यासाठी १५ पासून ऑनलाईन आवेदन अर्ज घेण्यात येणार आहेत. १५ मेपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात सेवानिवृत्ती, आंतरजिल्हा बदलीसह विविध कारणांनी रिक्त झालेल्या एकूण ५१ पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. अद्याप शासनाकडून जिल्ह्यासाठी नवीन पदे मंजूर केलेली नाहीत; मात्र शासनाकडून मंजूर पदांची माहिती उपलब्ध होताच पुन्हा भरती प्रक्रिया होणार आहे.
या भरतीसाठी १५ पासून ऑनलाईन अर्ज भरून घेतले जाणार असून याची अंतिम मुदत ३० पर्यंत आहे. या प्रक्रियेत उमेदवारांची शारीरिक व लेखी चाचणी प्रत्येकी १०० गुणांची घेण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये प्राप्त एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून ती प्रसिद्ध करण्यात येईल. त्यातून उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
First Published: Thursday, April 11, 2013, 19:38