Last Updated: Monday, February 11, 2013, 17:00
www.24taas.com, ठाणेठाणे महापालिकेत राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीत सहभागी असलेली मनसे आघाडीशी काडीमोड घेण्याच्या तयारीत आहे. लोकशाही आघाडीतून मनसे बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी मनसेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
ठाणे महापालिकेत मनसेचे 7 नगरसेवक आहेत. हे नगरसेवक राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीत सहभागी आहेत. आघाडीत सहभागी झाल्यानंतरही मनसेच्या वाट्याला फार काही आलेलं नाही. स्थायी समितीचं सभापतीपद मनसेला देण्याचं ठरलं होतं. मात्र काँग्रेसचा त्याला विरोध आहे. त्यामुळं मनसेच्या हाती ठाण्यात काहीही लागलेलं नाही.
ठाण्यातल्या आघाडीवर राज ठाकरेही खुष नाहीत. त्यामुळं मनसेनं आता वेगळा गट आणि वेगळी चूल मांडण्याचा निर्धार केला आहे.
First Published: Monday, February 11, 2013, 17:00