Last Updated: Monday, September 9, 2013, 13:40
www.24taas, झी मीडिया,अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास आणि जलसंधारण विभागात रिक्त पदासांठी भरती करणयात येणार आहे. याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठविण्याची मुदत आहे.
ग्राम विकास आणि जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन पत्र, जा. क्र. एपिटी २०१२/ प्र. क्र. ३२०/ आस्था-८, दिनांक १७ ऑगस्ट २०१३च्या अनुषंगाने रायगड जिल्हा परिषदेअंर्गत सरळ सेवा पद्धतीने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यातील आपले अर्ज २४ सप्टेंबर २०१३ सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत शिवतीर्थ, रायगड जिल्हा परिषद मुख्यालय, सिव्हील हॉस्पीटल समोर, कर्वे पथ, मु. पो. ता. अलिबाग, जिल्हा रायगड, पिन ४०२ २०१ या पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १ पद, पर्यवेक्षिका एकूण ५ पदे, औषध निर्माता एकूण ९ पदे, आरोग्य सेवक (महिला) १८ पदे, पशुधन पर्यवेक्षक एकूण ४ पदे, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) १६ पदे, विस्तार शिक्षण अधिकारी एकूण ५ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एकूण ७ पदे, परिचर एकूण ३९ पदे, स्त्री परिचर एकूण ११ पदे आहेत. उमेदवारांसाठी १८ ते ३३ वयाची अट असणार आहे. तर मागवर्गीय उमेदवारांसाठी ३८ वयोमर्यादा असेल.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) तर स्त्री परिचर उमेदवारांसाठी ७५ ते १५० रूपये परीक्षा शुल्क असेल. तर अन्य पदांसाठी १०० ते २०० रूपये परीक्षा शुल्क असणार आहे. अधिक माहिती www.raigad.gov.in आणि http://www.zpraigad.maharashtra.gov.in/या संकेस्थळावर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांची यादी, मुलाखतपात्र उमेदवारांची यादी, अंतिम निवड यादी याबाबतची माहिती या संकेस्थळावर देण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत म्हटले आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा. जाहिरात-भरती जाहिरात
First Published: Monday, September 9, 2013, 13:10