राष्ट्रवादी काँग्रेसचं `रेल रको` Rail Roko by NCP

राष्ट्रवादी काँग्रेसचं `रेल रको`

राष्ट्रवादी काँग्रेसचं `रेल रको`
www.24taas.com, झी मीडिया, बेलापूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज हार्बर मार्गावर बेलापूर स्टेशनजवळ रेल रोको आंदोलन केलं. रेल्वे स्थानकावरच्या गैरसोयींबाबत हे आंदोलन करण्यात आलं.

रेल्वे प्रशासन आणि सिडकोला यासंदर्भात जाब विचारण्यात आला. ठाणे -वाशी आणि सीएसटी -पनवेल या हार्बर मार्गावर रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण त्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडक्यांची कमतरता, स्थानकावरच्या तुटलेल्या लाद्या, अस्वच्छ प्रशासनगृह, पावसाळ्यात छतामधून पाणी गळणं अशी विविध समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावं लागतं.

या आंदोलनामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन सिडकोतर्फे देण्यात आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 18, 2013, 21:00


comments powered by Disqus