राज ठाकरे यांना सक्त ताकीद, Raj Thackeray present in court on 7 June, accommodation order

राज ठाकरे यांना हजर राहण्याची न्यायालयाची सक्त ताकीद

राज ठाकरे यांना हजर राहण्याची न्यायालयाची सक्त ताकीद
www.24taas.com, झी मीडिया, कल्याण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा अडचण वाढली आहे. ७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कल्याण सत्र न्यायालयाने दिले आहे. यावेळी हजर राहण्याची सक्त ताकीद न्यायालयाने दिलेय.

१८ ऑक्टोबर २००८ साली रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या उत्तरभारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांना काही अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र मागील महिन्यात मनसेने केलेल्या टोल आंदोलनानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत राज ठाकरे यांना जबाबदार धरत कल्याण जी आर पी ने राज ठाकरे यांना दिलेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी न्यायालयात केली होती.

याबाबत एक मार्च रोजी निर्णय होणार होता मात्र न्यायालयाने १५ मार्च त्यानंतर ८ एप्रिल तारीख देण्यात आली होती. या निर्णयावर आज पुन्हा न्यायालयाने राज ठाकरे यांना ७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याची सक्त ताकीद दिली असून त्याच दिवशी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ७ जून रोजी होणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 18:41


comments powered by Disqus