राज यांच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांची हातसफाई, raj thackeray visit: gold chain stolen in kalyan

राज ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांची हातसफाई

राज ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांची हातसफाई

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्यावेळी चोरांनी हातसफाई दाखवली आहे. या दौऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत एका महिलेचे मंगळसूत्र आणि चेन तर काहींचे मोबाइल आणि पाकीट चोरट्यांकडून लांबवण्यात आल्याचे समोर आले आहे.

विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांसाठी ठाकरे रविवारी कल्याणमध्ये आले होते. या वेळी दुर्गाडी येथील कार्यक्रमासाठी जाणार्याम मंजूषा धर्माधिकारी या विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि चेन असा ९० हजारांचा ऐवज मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सकाळी ११ वा.च्या सुमारास घडली.

याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धर्माधिकारी यांनी तक्रार केली आहे. याच दुर्गाडी परिसरातील कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन मोबाइल आणि पाकीटही लंपास केले.

या घटनांना पोलिसांनी दुजोरा दिला, परंतु याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात असताना या घटना घडल्याने आश्चेर्य व्यक्त होत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 25, 2013, 10:13


comments powered by Disqus