Last Updated: Thursday, March 28, 2013, 21:11
www.24taas.com, ठाण्यात ऐन सणाच्या दिवशी तीन वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास होळी दाखवण्याचा बहाणा करून घेऊन गेलेल्या एका तीन वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच परिसरात रहाणा-या धीरेंद्र उर्फ मोहनी सिंग चौहान या नराधमानं अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीसांनी धीरेंद्र या 24 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. होळी दाखवण्याचा बहाणा करून आणि खाऊ देतो असं सांगून त्यानं तीन वर्षाच्या मुलीला घेऊन, पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या बोगद्याखाली नेवून अत्याचार केले. या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं असता स्थानिक महिलांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.
दरम्यान, पोलीसांनी आरोपी धीरेंद्रला तेथून बाहेर काढले. याबाबत, त्या महिलांना समजताच महिलांनी पोलीसांच्या गाडीसमोर हंगामा केला. मात्र, पोलीसांनी त्या महिलांची समजूत काढल्यानंतर या महिला शांत झाल्या. कोपरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
First Published: Thursday, March 28, 2013, 21:11