Last Updated: Monday, November 11, 2013, 18:49
www.24taas.com, झी मीडिया, पालघरपालघर तालुक्यातील बोईसरमधील सुतारपाडा परीसरात एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. ९ तारखेला सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
शेजारीच राहणाऱ्या ज्योटी उर्फ निरंजन पुर्णचंद मंहती या तीस वर्षीय तरूणानं चॉकलेटचं आमिष दाखवून मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
घटनेनंतर आरोपी निरंजन पुर्णचंद मंहती फरार झाला आहे. पीडित मुलीवर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, November 11, 2013, 18:49