गुंगीचं औषध देऊन तरुणीवर दोनदा बलात्कार, rape on young girl in thane

गुंगीचं औषध देऊन तरुणीवर दोनदा बलात्कार

गुंगीचं औषध देऊन तरुणीवर दोनदा बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

घरकाम मिळवून देतो, असं आमिष दाखवत १८ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. ठाण्यामध्ये ही घटना उघडकीस आलीय. कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.

बाळकुम पाडा इथं राहणाऱ्या महादेव मंडलनं वडवली एका १८ वर्षीय तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं. घरकाम मिळवून देतो, असं सांगून त्याला या मुलीला आपल्या घरी येण्यास भाग पाडलं. काम मिळेल, पाच हजारांत घरखर्च निघेल या आशेनं पीडित तरुणी त्याच्या घरी गेली. पण, मंडलनं तिला थंड पेयातून गुंगीचं औषध दिलं आणि दोनदा तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीनं पोलीस स्टेशन गाठल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 18, 2013, 16:06


comments powered by Disqus